वाटूळ सोनारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

वाटूळ : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेना उपनेते (उबाठा) डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते वाटूळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील सोनारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. या कामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (२०२२-२३) निधी प्राप्त झाला असून, लवकरच या कामाची पूर्तता होणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला विभागप्रमुख वसंत जड्यार, उपविभागप्रमुख नागेश बने, माजी सभापती सुभाष गुरव, शाखाप्रमुख राहुल चव्हाण, बूथप्रमुख कृष्णा चव्हाण, शिवसेना महिला संघटक सौ. वर्षा कृष्णा चव्हाण, वाटूळ गावच्या सरपंच श्रीमती नीता चव्हाण, माजी सरपंच, शाखाप्रमुख अभय चव्हाण, संतोष भुर्के, माजी सरपंच नारायण चव्हाण, माजी उपसरपंच संजय चव्हाण, विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चव्हाण, ओमकार चव्हाण, सौ. प्रियांका भुर्के, सौ. कविता चव्हाण, शिवसैनिक राजेश चव्हाण, भानू नारकर, विष्णू घाटकर, संदीप भुर्के, विजय कातकर, सिद्धेश घाटकर, रामचंद्र इंदुलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply