रिफायनरी-एमएसएमई एकत्र आल्यास विकासाचा अनुशेष भरेल : राणे

रत्नागिरी : प्रस्तावित रिफायनरी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग एकत्र आल्यास रत्नागिरीच्या विकासाचा अनुशेष भरून निघायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.

एमएसएमईच्या रत्नागिरी औद्योगिक महोत्सवात उपस्थित प्रमुख पाहुणे श्री. राणे बोलत होते. ते म्हणाले, एका बाजूला असलेला सिंधुदुर्ग आणि दुसरीकडे असलेला रायगड जिल्हा यांची प्रगती सातत्याने होताना दिसते. सिंधुदुर्गाच्या शेजारी गोवा आहे, तर रायगडची भिस्त मुंबईवर असल्याने या दोन्ही जिल्ह्यांची भरभराट झाली आहे. पण तीच क्षमता, तेच नैसर्गिक स्रोत, तीच माणसे आणि त्याच संधी असतानाही रत्नागिरीचा विकास रखडलेला आहे, इथला माणूस प्रगतीची, उत्तम जीवनाची प्रतीक्षा करत आहे. अशा वेळी एमएसएमईच्या माध्यमातून रत्नागिरीसाठी विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.

रत्नागिरीतील ८० टक्के नागरिक प्रस्तावित रिफायनरीच्या बाजूने आहेत, तर २० टक्के नागरिक विरोधात आहेत. रिफायनरीसाठी बारसू येथे ९० टक्के जमीन एमआयडीसीने घेतली असून प्रकल्प आल्यास मोठे शहर तेथे उभे राहील, असेही ते म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply