रत्नागिरीत ६ मार्चपासून तीन दिवसांचा नमन महोत्सव

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या ६ मार्चपासून तीन दिवसांचा नमन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात तिन्ही दिवशी सायंकाळी ७ ते १० यावेळेत हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचा तपशील असा – बुधवार, दि. ६ मार्च : सादरकर्ते – १) झरेवाडी नाट्य नमन मंडळ मंदरूळ, राजापूर, २) बळीवंश कलामंच, कांदिवली (पूर्व), मुंबई, ३) श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ, जाधववाडी, माभळे, संगमेश्वर.

गुरुवार, दि. ७ मार्च : सादरकर्ते – १) साई श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप, चिखली, ता. गुहागर, जि.रत्नागिरी, २) नवलाईदेवी नमन मंडळ कुर्णे, पयडेवाडी, लांजा, ३) नवविकास नमन मंडळ, आबिटगाव, दत्तवाडी, चिपळूण.

शुक्रवार, दि. ८ मार्च : सादरकर्ते १) आई जीवदानी कला फाऊंडेशन, नाट्य नमन मंडळ, वीर, चिपळूण, २) रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ, लयभारी, रत्नागिरी, ३) श्री सिद्धिविनायक नाट्य नमन मंडळ, मंदरूळ, गणेशवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.

या महोत्सवाला प्रवेश मोफत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि प्रधान सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply