रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांचा महायुतीला कौल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदा आणि लांजा, गुहागर, देवरूख या तीन नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आज निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. चार ठिकाणी शिवसेना, दोन ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं आहे. खेड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २१ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. जिल्ह्यात भाजपने एकूण ३९ उमेदवार उभे केले होते, त्यांपैकी ३६ विजयी झाले असून, दोनपैकी दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. महायुतीमध्ये भाजपने नऊ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील सात जण विजयी झाले आहेत. रत्नागिरी शहरात महायुतीची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात पालकमंत्री आणि शिवसेना उपनेते उदय सामंत, भाजपचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार शिल्पा सुर्वे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रत्नागिरी नगर परिषद :
अध्यक्ष : शिल्पा सुर्वे (शिवसेना)
३२ पैकी २९ जागांवर महायुती, तीन जागांवर शिवसेना उबाठा
चिपळूण नगर परिषद :
अध्यक्ष : उमेश सकपाळ (शिवसेना)
२८पैकी १६ जागांवर महायुती (शिवसेना ९, भाजप ७), पाच जागांवर शिवसेना उबाठा, तीन जागांवर काँग्रेस, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
खेड नगर परिषद :
अध्यक्ष : माधवी बुटाला (शिवसेना)
२० पैकी २० महायुती (१७ शिवसेना, तीन भाजप)
राजापूर नगर परिषद :
अध्यक्ष : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस)
२० पैकी १० जागा महाविकास आघाडीला, १० जागा महायुतीला
गुहागर नगर पंचायत :
अध्यक्ष : नीता मालप (भाजप)
१७ पैकी १३ शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक, शिवसेना उबाठा एक, मनसे एक
लांजा नगर पंचायत :
अध्यक्ष : सावली कुरूप (शिवसेना)
१७ पैकी नऊ शिवसेना, एक भाजप, एक शिवसेना उबाठा, सहा अपक्ष
देवरूख नगर पंचायत :
अध्यक्ष : मृणाल शेट्ये (भाजप)
१७ पैकी १० महायुती, तीन उबाठा, चार अपक्ष

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply