किल्ले निवती स्वच्छता मोहीम

निवती (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथील ऐतिहासिक किल्ल्यावर स्थानिक दुर्गप्रेमींनी रविवारी, १३ डिसेंबरला स्वच्छता मोहीम राबवली.

किल्ल्याच्या चारी बाजूंनी खंदक असून किल्ल्याचा एकच बुरूज सुस्थितीत आहे. बाकी किल्ल्याची संपूर्ण पडझड झालेली आहे. ते वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तरुण मंडळी धडपडत आहेत. त्यांना स्थानिक मंडळींनी साथ दिली, तर किल्ल्याचे अस्तित्वात असलेले अवशेष तरी शाबूत ठेवता येतील, अशी अपेक्षा कोकण इतिहास परिषदेचे सदस्य
डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली. ते स्वतः काल स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

(डॉ. लिंगवत यांचे वेंगुर्ले येथे आयुर्वेद होमिओपॅथी क्लिनिक आहे. – संपर्क – 9421268258)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply