रत्नागिरी जिल्ह्यात ६, सिंधुदुर्गात करोनाचे नवे १४ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) करोनाचे ६ रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्गात नव्या १४ करोनाबाधितांची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार चिपळूणमध्ये २, तर अँटिजेन चाचणीनुसार दापोली ३, आणि संगमेश्वरमध्ये १ अशा ४ रुग्णांसह एकूण सहा रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ७६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या २७ जणांचा समावेश आहे. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या आठ हजार ९९९ झाली आहे. जिल्ह्यात आज ६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण आठ हजार ५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामुक्तीचे हे प्रमाण ९५.०६ टक्के आहे. आज चिपळूण येथील एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२५ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६१ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ६९४ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३४८ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. आज मुक्त झालेल्या २८ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार १८९ आहे. आतापर्यंत दुर्दैवाने १५१ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी झाली. आज मात्र एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply