रत्नागिरी जिल्ह्यात ११, सिंधुदुर्गात करोनाचे नवे ३० रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (शुक्रवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तेवढ्याच रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात नव्या ३० करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ५, खेड आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १ आणि संगमेश्वरमध्ये २ असे ९, तर अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी आणि दापोलीत प्रत्येकी १ असे दोघे रुग्ण आढळले. दोन्ही चाचण्या मिळून जिल्ह्यात आज नवे ११ रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ८१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या २६ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात उपचारांखाली आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १० झाली आहे. आज चाचणी घेतलेल्या आणखी १४१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ५७ हजार ६४२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज ११ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण आठ हजार ५६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामुक्तीचे हे प्रमाण ९५.०७ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२५ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६१ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ३० रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ७२४ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३६० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. आज मुक्त झालेल्या १८ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २०७ आहे. आतापर्यंत दुर्दैवाने १५१ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी झाली. आजही एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply