करोनाचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी ९ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ डिसेंबर) करोनाचे प्रत्येकी ९ नवे आढळले. रत्नागिरीत चार जण करोनामुक्त झाले असून, सिंधुदुर्गात आज एकही जण करोनामुक्त झालेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार ९ (रत्नागिरी ४, खेड २, चिपळूण ३) नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या ९९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ४८ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक २९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ९०६५ झाली आहे. आज चाचणी घेतलेल्या आणखी १०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ५८ हजार ४६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज ४ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण ८५९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्ह्यातील करोनामुक्तीचे प्रमाण ९४.८३ टक्के झाले आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६० टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ५७५६ झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३७९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५२२० आहे. आतापर्यंत दुर्दैवाने १५१ जणांचा मृत्यू झाला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply