रत्नागिरीत करोनाचे ११ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जानेवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ३, दापोलीत १ आणि चिपळूणमध्ये २ असे एकूण सहा नवे रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी २, तर संगमेश्वर तालुक्यात १ बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून एकूण ११). एकूण रुग्णांची संख्या आता ९४०६ झाली आहे. आज आणखी १४४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६३ हजार ९५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८८ आहे. त्यातील सर्वाधिक ३५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत.

जिल्ह्यात आज १६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८९५१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१६ टक्के झाला आहे.

आज एका नव्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४० झाली असून, मृत्युदर ३.६१ टक्के आहे. दापोली तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू १७ जानेवारीला सरकारी रुग्णालयात झाला. त्याची नोंद आज झाली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply