करोना युद्धात परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे : बाळ माने

रत्नागिरी : करोना महामारीचा सामना करताना डॉक्टरांसोबत परिचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर मात करण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेत नियोजन केले. त्यामुळेच करोनाच्या संकटातून आपण वाचलो. आता पूर्ण भारतीय बनावटीचीच लसही आल्यामुळे करोना हद्दपार करण्यात यश मिळेल. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वीस्त माजी आमदार बाळ माने यांनी केले.

येथील दि यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन बाळ माने यांनी नर्सिंग कॉलेजच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करोनाकाळात जाणीवपूर्वक काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नर्सिंग कॉलेजही बंद झाले. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी शिकत राहिले. अन्य अभ्यासक्रम कमी केले असले तरी नर्सिंगचा अभ्यासक्रम कमी करून चालणार नाही. त्यामुळे आता करोनाचे नियम पाळून पुन्हा महाविद्यालय सुरू झाले आहे. महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सकस आहार, जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी सुदृढ, सशक्त होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या विकासयोजनांचाही आढावा श्री. माने यांनी घेतला. नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. त्यामुळेच दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या शेजारीच विद्यार्थिनी वसतिगृहाचे काम प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येणार्याद विद्यार्थिनींना शिक्षणासह निवासाची सुविधाही तेथे मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी सहव्यवस्थापकीय विश्वसस्त मिहिर माने, विराज माने, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply