रत्नागिरी : येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत श्री साई मंडळातर्फे आज (२६ जानेवारी) मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच आवश्यक त्यांचा इसीजी काढण्यात आला. तसेच वैद्यकीय सल्ला देण्यात आला. ज्या रुग्णांना अधिक तपासण्या कराव्या लागणार आहेत, त्या सवलतीच्या दरात हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत.
शिबिराला सरपंच राजू नलावडे, हॉस्पिटलचे डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. अजित पवार, डॉ. रवींद्र गोडे, डॉ. दयानंद क्षीरसागर, डॉ. प्रथमेश गराटे उपस्थित होते.
शिबिर आयोजित करण्यास सौ. तेजा मुळ्ये यांचे सहकार्य लाभले. तसेच साईसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि अपेक्स हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत तपासणी शिबिराचा उपक्रम यशस्वी झाल्याचे श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी यावेळी सांगितले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Mediaशेअर करा...
Related
शेअर करा...
Related

