रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१६ एप्रिल) प्रथमच पाचशेची संख्या ओलांडली. आज ५२२ करोनाबाधित आढळले, तर केवळ ५९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज आठ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
आजही सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १२५ रुग्ण चिपळूण तालुक्यात, तर त्याखालोखाल १२४ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९६, दापोली १६, खेड २९, गुहागर ४३, चिपळूण ८३, संगमेश्वर ३६, लांजा ११, राजापूर ३. (एकूण ३१७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २८, दापोली ३९, खेड ७, गुहागर २०, चिपळूण ४२, संगमेश्वर ६३ आणि मंडणगड १.(एकूण २०५) (दोन्ही मिळून ५२२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १४ हजार ५६० झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ९४२ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून एक हजार ६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार ४८८ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी कमी झाला असून तो ७८.९० टक्के झाला आहे.
आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ४०८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख २४ हजार ६९० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आज आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कालच्या सात आणि आजच्या एका रुग्णाचा समावेश आहे. सर्व आठ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला. मृतांचा तपशील असा –
१५ एप्रिल – रत्नागिरी, पुरुष (वय ८८), रत्नागिरी, महिला (७०), रत्नागिरी, पुरुष (५९), रत्नागिरी, पुरुष (६५), लांजा, पुरुष (८०), रत्नागिरी, पुरुष (४५), रत्नागिरी, पुरुष (८०). १६ एप्रिल – गुहागर, पुरुष (६५ वर्षे). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४२९ असून मृत्युदर २.९४ टक्के आहे.
महिला रुग्णालयातील करोना चाचणी केंद्राचे स्थलांतर
रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात असलेले करोना चाचणी केंद्र उद्यापासून (१७ एप्रिल) शिर्के हायस्कूलमध्ये हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. आज महिला रुग्णालयात अनेक लोक आणि व्यापारी आरटी-पीसीआर टेस्टिंगसाठी गेले असता तेथे त्यांना बराच वेळ खोळंबून राहावे लागले. जागृत पत्रकारांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेऊन तपासणी केंद्र आता उद्यापासून शिर्के हायस्कूलमध्ये हलवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.

