सिंधुदुर्गात करोनाचे नवे १३० रुग्ण, ४१ जण करोनामुक्त, चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १३१ रुग्ण आढळले, तर ४१ जण करोनामुक्त झाले. आज चौघांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या १३१ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ९ हजार २४१ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८७५, दोडामार्ग – ४९०, कणकवली – २५११, कुडाळ – १९६४, मालवण – ९३५, सावंतवाडी – ११९३, वैभववाडी – ४८६, वेंगुर्ले ७३३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५४.

आज ४१ जण करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ हजार ५३ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्याएक हजार ९७७ आहे. सर्वाधिक ४०३ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड २९७, दोडामार्ग १०९, कणकवली ३१९, मालवण २४८, सावंतवाडी २११, वैभववाडी २५५, वेंगुर्ले ११३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२.

आज चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. जांभवडे, ता. कुडाळ येथील ४१ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २) मु. पो. सावंतवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष. त्याला हृदयविकाराचा आजार होता. ३) मु. पो. तिर्लोट, ता. देवगड येथील ७० वर्षीय महिला. तिला अस्थमाचा आजार होता. ४) मु. पो. सिद्धार्थवाडी, ता. वैभववाडी येथील ८५ वर्षीय महिला. तिला मधुमेहाचा आजार होता. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २०५ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply