सिंधुदुर्गात करोनाचे नवे ३२५ रुग्ण, ४६ जण करोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे ३२५ (त्यातील ३ जिल्ह्याबाहेरील लॅब) रुग्ण आढळले, तर ४६ जण करोनामुक्त झाले. आज पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या ३२५ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ९ हजार ५६६ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८९८, दोडामार्ग – ५११, कणकवली – २६०२, कुडाळ – २०११, मालवण – ९६९, सावंतवाडी – १२५६, वैभववाडी – ५०८, वेंगुर्ले ७५७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५४.

आज ४६ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ९९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार २५१ आहे. सर्वाधिक ४३९ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३१७, दोडामार्ग १२७, कणकवली ३८६, मालवण २८२, सावंतवाडी २७०, वैभववाडी २७२, वेंगुर्ले १३६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२.

आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. सरदारवाडी, ता. वैभववाडी येथील ८५ वर्षीय महिला. (तिला मधुमेहाचा आजार होता.) २) मु. पो. तुळस, ता. वेंगुर्ले येथील ८२ वर्षीय पुरुष. (त्याला मधुमेह, उच्च रक्दाबाचा आजार होता.) ३) मु. पो. सोनाळी, ता. वैभववाडी येथील ६० वर्षीय पुरुष. ४) मु. पो. नांदगाव, ता. कणकवली येथील ७५ वर्षीय पुरुष (त्याला उच्च रक्दाबाचा आजार होता.) ५) मु. पो. केसरी, ता. सावंतवाडी येथील ७२ वर्षीय पुरुष (त्याला उच्च रक्तदाबाचा आजार होता.) या पाच जणांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २१० झाली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply