रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रिक्षा सेनेकडून करोना संचारबंदीच्या काळात खेड तालुक्यातील सर्व जनतेला जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी यांनी ही माहिती दिली.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे रिक्षा सेनेमार्फत जनतेला आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू अर्थात किराणामाल, औषधे, बेकरी, भाजी, दूध व फळे या वस्तूंची घरपोच सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील जनतेने रिक्षा सेनेच्या सभासदांना आपल्या व्हॉट्स अॅपवरून वस्तूंची यादी पाठवावी आणि घरपोच वस्तूंची सुविधा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सुविधेसाठी मनसे रिक्षा सेनेचे सिकंदर बांगी (7507705454), विशाल कापडी (9923545657), ऋषिकेश पाटणे (9028800020), ऋषिकुमार दिवाळे (9850168423), दिलावर रावल (8329629519), तसवूर रावल (8087326917), महेश भुवड (9892862354), सलीम रावल (9975003359) हकीम तांबे (9834188226), नीलेश कुळे (9158554244), सुनील मोहिते (9921686554) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
करोनाप्रतिबंधक लस घेणाऱ्यांसाठी मोफत रिक्षा
खेड नगरपालिकेच्या दवाखान्यात नागरिकांना करोना लस देण्यात येत आहे. ती लस घेण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोफत रिक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष रंगाशेठ माने यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुकाध्यक्ष आणि नगरसेवक शरद शिर्के, विभाग अध्यक्ष सागर कवळे, मनविसे खेड शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, डॉ. विक्रांत पाटील, रहिम सहिबोले, दादू नांदगावकर, सिद्धेश साळवी, राहुल पाटणे, विभाग अध्यक्ष हर्ष गांधी, संतोष पवार, विजय खेडेकर, प्रदीप भोसले, उदय गुडेकर आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड