कोविडयोद्ध्यांच्या मदतीसाठी दुचाकी मेकॅनिक सज्ज

रत्नागिरी : लॉकडाउन काळात कोविड योद्ध्यांची गैरसोय लक्षात घेऊन मॅकेनिक स्किल डेव्हलपमेंट क्लब “हाक तुमची साथ आमची” या ब्रीदवाक्याने कोविड योद्ध्यांना सेवा देण्याच्या हेतूने सरसावला आहे.

जागतिक महामारी असलेल्या करोनाने जगाचे अर्थचक्र बिघडवले आहे. आता पुन्हा करोनानं डोक वर काढलय या करोनाशी दोन हात करायला करोना योद्धे पुन्हा सज्ज झाले आहेत. मात्र या करोनायोद्ध्यांचेदेखील अनेक प्रश्न आहेत. त्यांना मदत करण्याच्या हेतूने एमएसडीसी ही संस्था पुढे आली आहे.

लॉकडाउनच्या काळामध्ये पोलीस, वैद्यकीय क्षेत्रातील माणसे, इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा यांची खूप धावपळ सुरू असते. अशातच त्यांच्या दुचाकी बंद पडतात. परिणामी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या दुचाकी बंद पडल्यास रत्नागिरीच्या मेकॅनिक स्किल डेव्हलपमेंट क्लबचे सदस्य त्यांना मदत करणार आहेत. बंद पडलेली दुचाकी शक्य असल्यास जागेवर अथवा गॅरेजमध्ये आणून त्याची दुरुस्ती ते करणार आहेत. कोविड योद्ध्यांनी दिलेल्या हाकेला साद देण्यासाठी एमएसडीसीचे पथक तत्पर आहेत.

एमएसडीसीकडून मदत हवी असेल, तर सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१) सौ. कल्याणी शिंदे – 9730246262

२) प्रशांत पोमेंडकर – 9665377507

३) विनोद कळंबटे – 9423293048

४) सुशील कदम – 9029996844

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply