रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ५८८ रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० एप्रिल) ५८८ नवे करोनाबाधित आढळले. आज १६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. जिल्ह्यात आज कितीजण करोनामुक्त झाले, याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून उपलब्ध झाली नाही.

जिल्ह्यात आज सर्व नऊ तालुक्यांमध्ये करोनाबाधित आढळले. सर्वाधिक १६७ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ११४, दापोली ९, खेड ४, गुहागर २६, चिपळूण ५४, संगमेश्वर २०, मंडणगड ६, लांजा २२, राजापूर ४९. (एकूण ३०४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५३, दापोली ४१, खेड ४०, गुहागर ६५, चिपळूण ३४, संगमेश्वर ३४, लांजा १२ आणि राजापूर ५. (एकूण २८४). (दोन्ही मिळून ५८८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार २८३ झाली आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ७ आणि आजचे ९ अशा एकूण १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या ९ मृतांपैकी ८ जण शासकीय रुग्णालयांत, तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात मरण पावला. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६५६ झाली असून मृत्युदर २.९४ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १६७, खेड ८२, गुहागर २८, दापोली ६३, चिपळूण १३२, संगमेश्वर ९६, लांजा ३४, राजापूर ४७, मंडणगड ७.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply