करोना विलगीकरणातील आणि बरे झालेल्यांसाठी अभाविपची हेल्पलाइन

रत्नागिरी : जिज्ञासा आणि अभाविप रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींसाठी, तसेच करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी मानसिकदृष्ट्या आधारासाठी आरोग्यमित्र हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोनाबाधेमुळे किंवा करोनाच्या आजाराच्या प्रसाराचे चित्र पाहिल्यानंतर मानसिक तणाव जाणवत असेल, तर काय करावे, मला करोनासारखी लक्षणे आहेत तर काय करू, घरी राहून स्वतःची काळजी कशी घ्यायची,
मला बेड मिळेपर्यंत काय करू, असे अनेक प्रश्न करोनाबाधितांच्या मनात असतील. त्यावरचा उपाय म्हणूनच जिज्ञासा आणि रत्नागिरीच्या अभाविपतर्फे आरोग्यमित्र ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींसाठी त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नासाठी ही हेल्पलाइन आहे. त्याकरिता संपर्क साधता येईल. त्याचे वेळापत्रक असे – सकाळी अदिती -8007918393, अमोल -7350099677. संध्याकाळी – अस्मिता – 8108099738, तेजल – 7045361843, अक्षदा – 9112467146.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply