रत्नागिरीत करोना चाचणी पथक आपल्या दारी उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शहरात फिरते करोना चाचणी पथक सज्ज करण्यात आले आहे. दररोज शहराच्या विविध भागात हे पथक चाचण्या करणार आहे.

करोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने रत्नागिरी पालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरते करोना चाचणी पथक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागातील एका विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दिवशी फिरत्या पथकाद्वारे करोना आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होऊन योग्य उपचारांमुळे संभाव्य जीवितहानी टळू शकेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

संशयित किंवा सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या ठिकाणी फिरत्या चाचणी पथकाद्वारे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी तपासणी पथकाच्या ठिकाणी करोनाविषयक नियमावलीचे पालन करून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तपासणी करून घ्यावी.

पथकाची ठिकाणे अशी – सोमवार – अ. के. देसाई हायस्कूल, माळनाका. मंगळवार – धनंजय कीर सभागृह, पालिका कर्मचारी वसाहत. बुधवार – जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर, रत्नागिरी. गुरुवार – पालिका शाळा क्र. १ गाडीतळ. शुक्रवार – पालिका शाळा क्र. ८, भैरी मंदिरजवळ. शनिवार – भागेश्वर विद्यामंदिर, किल्ला, शाळा क्र. ९. रविवारी – पालिका शाळा क्र. ३, चवंडे वठार.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply