रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ मे) करोनाचे नवे ४८१ रुग्ण आढळले. त्यामध्ये कालच्या रॅपिड अँटिजेन टेस्टने निष्पन्न झालेल्या १९१ जणांचा समावेश आहे. आज ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १११, दापोली ३, चिपळूण ५४, संगमेश्वर १९, लांजा ४ आणि राजापूर ४२ (एकूण २३३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५, दापोली १२, खेड २१, गुहागर ५, चिपळूण ७, लांजा ७. (एकूण ५७). (दोन्ही मिळून २९०). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १९१. (सर्व मिळून ४८१).
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २८ हजार ८३६ झाली आहे. आजही मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ४५१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ६३४ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार १८५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ८२४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २३ हजार ५०९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८१.५२ टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे ४ आणि आजचे १६ अशा एकूण २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आज मरण पावलेल्या १६ पैकी तिघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ८७६ झाली असून मृत्युदर ३.०३ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २४१, खेड १००, गुहागर ३६, दापोली ७८, चिपळूण १७५, संगमेश्वर १२२, लांजा ५२, राजापूर ६३, मंडणगड ९. (एकूण ८७६).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
