सिंधुदुर्गात नवे ५६१ करोनाबाधित, १०३३ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २६ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ५६१ करोनाबाधित आढळळे, तर १०३३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले.

जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तपासणीनुसार ८ जणांसह जिल्ह्यात आज एकूण ५६१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २३ हजार ७८३ झाली आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५१, दोडामार्ग – ३३, कणकवली – ९३, कुडाळ – १३८, मालवण – ६०, सावंतवाडी – १२०, वैभववाडी – २८, वेंगुर्ले – ३८.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४९८, दोडामार्ग ३६८, कणकवली ७३७, कुडाळ ९७०, मालवण ८५१, सावंतवाडी ७०९, वैभववाडी १७३, वेंगुर्ले ३१३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १६. सक्रिय रुग्णांपैकी ३६६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३१८ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६२८ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कणकवली ३, सावंतवाडी १, कुडाळ २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ७८, दोडामार्ग – १८, कणकवली – १३३, कुडाळ – ९२, मालवण – ९७, सावंतवाडी – १०७, वैभववाडी – ४६, वेंगुर्ले – ५५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

एकूण १७ हजार ४८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात पाच हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply