रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ मे) करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविली गेली. आज नवे ६३५ रुग्ण आढळले, तर ५९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १२१, दापोली १, गुहागर ५, चिपळूण १८, संगमेश्वर २२, लांजा ३५ आणि राजापूर ४९ (एकूण २५१) अतिरिक्त आरटीपीआर चाचण्या १३४. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत १५, चिपळूण १. (तिन्ही मिळून ४०१). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २३४. (सर्व मिळून ६३५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३४ हजार १८९ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ४२० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार २३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ९२६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ५९६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २९ हजार ३३५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८६.६७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १३४ झाली आहे. मृत्युदर ३.३१ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३२७, खेड ११९, गुहागर ६२, दापोली ९९, चिपळूण २२७, संगमेश्वर १४६, लांजा ६२, राजापूर ८०, मंडणगड १२. (एकूण ११३४).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply