सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ६ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६०४, तर एकूण २३ हजार २४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यापैकी कोळंब (ता. मालवण) येथील ४१ वर्षीय करोनामुक्त रुग्णाने जिल्हा रुग्णालयाविषयीच्या आपल्या चांगल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या जिल्ह्यात ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६५२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३० हजार २३१ झाली आहे.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ११४, दोडामार्ग – १४, कणकवली – ७९, कुडाळ – ९७, मालवण – १८६, सावंतवाडी – ६८, वैभववाडी – १०, वेंगुर्ले – ७१, जिल्ह्याबाहेरील २.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९३८, दोडामार्ग २६६, कणकवली ९९५, कुडाळ ११५५, मालवण १२२४, सावंतवाडी ८३९, वैभववाडी २५४, वेंगुर्ले ५२७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी ३४० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात आधीच्या ४ आणि आजच्या ९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७५७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कणकवली ३, कुडाळ २, मालवण ५, सावंतवाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १०३, दोडामार्ग – २३, कणकवली – १५५, कुडाळ – ११४, मालवण – १२५, सावंतवाडी – १२२, वैभववाडी – ५१, वेंगुर्ले – ६२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
………
दिलासादायक वृत्त
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सनी मृत्यूच्या दाढेतून परत आणले
मधुमेह, उच्च रक्तदाब, त्यातच करोनाची लागण. यामुळे माझी प्रकृती बरीच खालावली होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सनी योग्य उपचार करत मला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. अशी भावना कोळंब ( ता. मालवण) येथील ४१ वर्षीय करोनामुक्त रुग्णाने व्यक्त केली आहे.
करोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात करोनाची चाचणी केली. तपासणीत ते पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. अकरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. घरी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हा रुग्णालयातील आपल्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, रुग्णालयात दाखल झालो, त्यावेळी माझी ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. एचआरसीटीचा स्कोअर साडेसतरा इतका होता. त्यातच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे दोन्ही आजार मला होते. त्यामुळे प्रकृती बिघडली होती. पण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी चांगली काळजी घेतली. आम्हाला दोन वेळा वेळेवर जेवण, काढा, अंडी दिली जात होती. मध्यरात्रीसुद्धा वॉर्डमधील नर्स दक्ष असत. तेव्हा ताप, रक्तदाब यांची तपासणी केली जात होती. मधुमेह असल्याने आहाराचे नियोजन केले होते. वेळेवर औषधे दिली जात होती. डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचारांमुळेच मी मृत्यूच्या दाढेतून परतलो आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
