सिंधुदुर्गात बाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ११ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६११ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ६३० जण करोनामुक्त झाले. सलग दुसऱ्या दिवशी नवबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील तपासणीत बाधित आढळलेल्या सात जणांसह ६११ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८०, दोडामार्ग – ३४, कणकवली – ८०, कुडाळ – १६७, मालवण – ११२, सावंतवाडी – ७०, वैभववाडी – २०, वेंगुर्ले – ४५, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९०८, दोडामार्ग २४६, कणकवली १०७८, कुडाळ १३८३, मालवण १२२२, सावंतवाडी ८५१, वैभववाडी ३०६, वेंगुर्ले ५५१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २९. सक्रिय रुग्णांपैकी ३२२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८५५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – कणकवली १, कुडाळ २, मालवण ९, वैभववाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ११८, दोडामार्ग – २६, कणकवली – १७३, कुडाळ – १३०, मालवण – १५१, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५९, वेंगुर्ले – ६५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply