रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ जून) करोनाचे नवे ६९३ रुग्ण आढळले, तर ८६५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या आज वाढली आहे. आज २८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ४७१, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २२२ (दोन्ही मिळून ६९३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४२ हजार ९५२ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.६१ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ४९४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार ५७६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ९११ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ८६५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३६ हजार ९८५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आज वाढली असून ती ८६.१० टक्के झाली आहे.

जिल्ह्यात पूर्वीच्या १६ आणि आजच्या १२ अशा २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ४७३ झाली आहे. मृत्युदर ३.४२ टक्के झाला आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४३२, खेड १४०, गुहागर १२२, दापोली १२३, चिपळूण २८६, संगमेश्वर १७२, लांजा ७९, राजापूर १०७, मंडणगड १२. (एकूण १४७३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply