रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ जून) करोनाचे नवे ४२६ रुग्ण आढळले, तर ७१९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी वाढली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी २८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २२८, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १९८ (दोन्ही मिळून ४२६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४३ हजार ३७८ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.५१ टक्के आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार १७३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार ३५३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख चार हजार २६४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ७१९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३७ हजार ७०४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आज वाढली असून ती ८६.९१ टक्के झाली आहे.
जिल्ह्यात पूर्वीच्या १६ आणि आजच्या १२ अशा २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ५०१ झाली आहे. मृत्युदर ३.४६ टक्के झाला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४३७, खेड १४५, गुहागर १३२, दापोली १२३, चिपळूण २९३, संगमेश्वर १७२, लांजा ७९, राजापूर १०८, मंडणगड १२. (एकूण १५०१).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
