रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा पाचशेहून अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ जून) पुन्हा एकदा नव्या करोनाबाधितांची संख्या पाचशेहून अधिक म्हणजे ५९७ झाली आहे. काल नव्या करोनाबाधितांची संख्याही अनेक दिवसांनी पाचशेच्या खाली आली होती. त्यामुळे मिळालेला दिलासा केवळ २४ तासांचा ठरला. आज केवळ २०२ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ५०३, अँटिजेन चाचणी – २०५ (एकूण ५०३). आधी नोंद न झालेल्या ९४ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५९७ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६० हजार ६४२ झाली आहे.

जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर कालच्या ६.७१ टक्क्यांच्या तुलनेत वाढला असून तो ९.२५ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.४९ टक्के आहे. आज सहा हजार ७६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सहा हजार ६४६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ५६ हजार ९९५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज २०२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५२ हजार ८३३ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.२१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७३३ झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५६४, खेड १६५, गुहागर १३८, दापोली १४५, चिपळूण ३३९, संगमेश्वर १५१, लांजा ९२, राजापूर १०१, मंडणगड २४. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७३३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply