रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ जून) नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा पाचशेच्या वर गेली आहे. आज एकाच दिवशी ३३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २१६, अँटिजेन चाचणी – २१५ (एकूण ४३१). आधी नोंद न झालेल्या १२३ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५५४ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६१ हजार ५७६ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ९.१२ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.५५ टक्के आहे.
आज पाच हजार ९२६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज पाच हजार ४४२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ६८ हजार ८३५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ३०५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५३ हजार ८७९ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.६५ टक्के आहे.
जिल्ह्यात आज विक्रमी ३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७७१ झाली आहे. मृत्युदर पुन्हा एकदा वाढून २.८८ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५७७, खेड १६७, गुहागर १३८, दापोली १४९, चिपळूण ३४९, संगमेश्वर १५८, लांजा ९२, राजापूर १०३, मंडणगड २४. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७७१).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
