रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २४७ रुग्ण, ५९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जुलै) करोनाचे नवे २४७ रुग्ण आढळले, तर ५९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज ५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.७९ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर ९७, अँटिजेन चाचणी १५० (एकूण २४७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६७ हजार ९७६ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ५.७१ असून एकूण रुग्णवाढीचा दर १३.०७ टक्के आहे.

आज तीन हजार ६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ४२३ गृह विलगीकरणात, तर एक हजार ५८३ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६३४ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.

आज चार हजार ८२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५६ हजार १७८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात ५९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६२ हजार ३९८ झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वीच्या ६ आणि आजच्या ३ अशा ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९३८ झाली आहे. मृत्युदर २.८८ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६३९, खेड १७५, गुहागर १४४, दापोली १६९, चिपळूण ३७३, संगमेश्वर १७६, लांजा १००, राजापूर ११९, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९३८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply