सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या एकाच मृत्यूची नोंद

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (५ ऑगस्ट) करोनामुळे एकाच रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला. नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्याही सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. आज दोडामार्गमध्ये नवा एकही रुग्ण आढळला नाही.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दुबार तपासणी केलेल्या दोघांसह आज करोनाचे नवे ११२ रुग्ण आढळले, तर १५६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ हजार ९२७ झाली असून ४५ हजार ४०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या दोन हजार २५९ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३४३, दोडामार्ग ५९, कणकवली ३८४, कुडाळ ६०८, मालवण २९७, सावंतवाडी २७९, वैभववाडी १२३, वेंगुर्ले १५२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १४. सक्रिय रुग्णांपैकी ११६ रुग्ण ऑक्सिजनवर तर २९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २९, दोडामार्ग – ०, कणकवली – १७, कुडाळ – २३, मालवण – ११, सावंतवाडी – १६, वैभववाडी – ३, वेंगुर्ले – ११.

आज जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २६० झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६१, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६४, कुडाळ – १९२, मालवण – २५८, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply