रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९६ च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ३७ करोनाबाधित आढळले, ५४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ६६० झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९६.०१ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ३७ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९७३ पैकी ९५५ अहवाल निगेटिव्ह, तर १८ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७८२ नमुन्यांपैकी ७६३ अहवाल निगेटिव्ह, तर १९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ९१४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ४८ हजार ६७१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६६६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४२८, तर लक्षणे असलेले २३८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३८७ आहे, तर २७९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी १९ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४१, डीसीएचसीमधील १०१, तर डीसीएचमध्ये १३७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५५ जण ऑक्सिजनवर, २० रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१५ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४१८ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २११, रत्नागिरी ८०५, लांजा १२४, राजापूर १६०. (एकूण २४१८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply