दहावीच्या गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव सप्रे यांचे यूट्यूब चॅनेल

रत्नागिरी : येथील प्रा. डॉ. राजीव सप्रे यांनी मॅथ्स मेड इझी हे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. डॉ. सप्रे रत्नागिरीतील गोगटे- जोगळेकर महाविद्यायाच्या गणित विभागाचे निवृत्त विभागप्रमुख आहेत. त्यांना अध्यापनाचा ३८ वर्षांचा परिपूर्ण अनुभव आहे.

त्यांनी सुरू केलेल्या यूट्यूब चॅनेलवर दहावीच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले व्हिडीओ विद्यार्थ्यांना मिळतील. या व्हिडीओमध्ये अभ्यासक्रमातील गणित हा विषय अतिशय सोप्या भाषेत समजून घेता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चॅनेलला अवश्य भेट द्यावी, सोप्या भाषेत गणित शिकावे असे आवाहन डॉ. सप्रे यांनी केले आहे. आपल्या संपर्कात असलेले दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना या चॅनेलबाबत अवश्य माहिती द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

सध्या करोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. काही वेळा गणित विषय समजून घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्या सोडवण्यासाठी डॉ. सप्रे यांचे हे यूट्यूब चॅनेल खूपच उपयुक्त ठरत आहे. या चॅनेलमुळे आपण कधीही गणिताचा विषय वारंवार पाहू शकतो. डॉ. सप्रे यांची साध्या, सोप्या भाषेत शिकवण्याची खासियत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरणार आहे.

यूट्यूब चॅनलची लिंक अशी –

 https://youtube.com/channel/UCujDf8-Gpfne5po-vE5M4hg

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply