रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांमध्ये आज (दि. २८ सप्टेंबर) पुन्हा वाढ झाली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार नवे ८३ करोनाबाधित आढळले, ५५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ७७ हजार ८२७, तर करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या ७४ हजार ७१५ झाली झाली आहे. बरे होण्याची टक्केवारी ९६.०० झाली आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ८३ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १३८८ पैकी १३४५ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १८२६ नमुन्यांपैकी १७८६ अहवाल निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ५१ हजार ८०२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात ६९४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४४२, तर लक्षणे असलेले २५२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४०३ आहे, तर २९१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३९, डीसीएचसीमधील ९९, तर डीसीएचमध्ये १५३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६७ जण ऑक्सिजनवर, २१ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४१८ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २११, रत्नागिरी ८०५, लांजा १२४, राजापूर १६०. (एकूण २४१८).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
