सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ८७ रुग्ण आढळले, तर २१ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी याबाबतचा अहवाल दिला.
आज दुबार तपासणी केलेल्या दोघांसह नवे ८७ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ९०३ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ७, कणकवली १९, कुडाळ १४, मालवण १६, सावंतवाडी ११, वैभववाडी १, वेंगुर्ले ११. जिल्ह्यात सध्या १२०८ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४७ रुग्ण ऑक्सिजनवर, तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ११८, दोडामार्ग ४१, कणकवली २२६, कुडाळ २८२, मालवण २१७, सावंतवाडी १७३, वैभववाडी ३८, वेंगुर्ले १०२, जिल्ह्याबाहेरील ११.
कालच्या एका आणि आजच्या एका अशा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज मरण पावलेली ६६ वर्षीय महिला वराड (ता. मालवण) येथील होती. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४०१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७५, दोडामार्ग – ३९, कणकवली – २९०, कुडाळ – २३१, मालवण – २७८, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
