रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ६२ रुग्ण, ७९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ सप्टेंबर) करोनाचे नवे ६२ रुग्ण आढळले, तर ७९ करोनामुक्त झाले. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ७७ हजार ८८९, तर करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या ७४ हजार ७९४ झाली झाली आहे. बरे होण्याची टक्केवारी ९६.०३ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ६२ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ८७७ पैकी ८५३ अहवाल निगेटिव्ह, तर २४ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १९८८ नमुन्यांपैकी १९५० अहवाल निगेटिव्ह, तर ३८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ५४ हजार ६०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात ६७४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४४०, तर लक्षणे असलेले २३४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४०५ आहे, तर २६९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३५, डीसीएचसीमधील ८५, तर डीसीएचमध्ये १४९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७४ जण ऑक्सिजनवर, २५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४५ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४२१ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१२, रत्नागिरी ८०६, लांजा १२५, राजापूर १६०. (एकूण २४२१).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply