coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी १७९ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२९ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत १७९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपल्या अहवालात ही माहिती दिली.

आज जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या एका रुग्णासह नवे ३१ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ९३४ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ १२, मालवण ४, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३. जिल्ह्यात सध्या १०५८ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ५३ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९८, दोडामार्ग ३४, कणकवली १९०, कुडाळ २६०, मालवण १७४, सावंतवाडी १६३, वैभववाडी ३०, वेंगुर्ले ९८, जिल्ह्याबाहेरील ११.

तळाशील (मालवण) आणि फोंडा (कणकवली) येथील प्रत्येकी एका महिला रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४०३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७५, दोडामार्ग – ३९, कणकवली – २९१, कुडाळ – २३१, मालवण – २७९, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply