person in white long sleeve shirt holding clear bottle

रत्नागिरीत करोनामुक्तांपेक्षा नवबाधितांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ ऑक्टोबर) करोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या बाधितांची संख्या अधिक आहे. आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ५१ रुग्ण आढळले, तर ४४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ३८१ झाली असून, ७५ हजार ३३४ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.११ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ५१ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७७० पैकी ७४४ अहवाल निगेटिव्ह, तर २६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ९०९ नमुन्यांपैकी ८८४ अहवाल निगेटिव्ह, तर २५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७३ हजार ८२८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६०९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३३८, तर लक्षणे असलेले २७१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३०१ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २७१ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३७, डीसीएचसीमधील ११६, तर डीसीएचमध्ये १५५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५७ जण ऑक्सिजनवर, २३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३३ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४३८ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१४, रत्नागिरी ८१४, लांजा १२६, राजापूर १६२. (एकूण २४३८).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply