रत्नागिरीत पुन्हा नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ ऑक्टोबर) पुन्हा एकदा करोनाबाधित झालेल्यांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. आजही दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ४३ रुग्ण आढळले, तर १०२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ४२४ झाली असून, ७५ हजार ४३६ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.१९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ४३ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १४१२ पैकी १३८७ अहवाल निगेटिव्ह, तर २५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १२६० नमुन्यांपैकी १२४२ अहवाल निगेटिव्ह, तर १८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७६ हजार ४५७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ५४८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २९१, तर लक्षणे असलेले २५७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २६७ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २८१ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २४, डीसीएचसीमधील १२१, तर डीसीएचमध्ये १३६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६२ जण ऑक्सिजनवर, २९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३६ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४४० झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१४, रत्नागिरी ८१४, लांजा १२७, राजापूर १६२. (एकूण २४४०).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply