hands with latex gloves holding a globe with a face mask

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३६

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ डिसेंबर) करोनाचे नवे ५ रुग्ण आढळले, तर ४ जण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कालच्या ३५वरून आज ३६ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे.

आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ५ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ११० झाली आहे. आज ४ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६०१ पैकी ६०० जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४११ नमुन्यांपैकी ४०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर चौघांचा पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३८ हजार १३५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १६, तर लक्षणे असलेले २० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १६, तर संस्थात्मक विलगीकरणात २० जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १२, तर डीसीएचमध्ये ८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर असून, एकही रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल नाही.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (३ डिसेंबर) लसीकरणाची ८४ सत्रे झाली. त्यामध्ये ३१९८ जणांनी पहिला, तर ८९३३ जणांनी दुसरा डोस घेतला. एकूण १२,१३१ जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ६४ हजार २०७ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ९ लाख ६५ हजार २०३ जणांनी पहिला, तर ४ लाख ९९ हजार ३ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply