coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात २६ सक्रिय करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ डिसेंबर) एक नवा करोनाबाधित आढळला, तर दोन रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २६ सक्रिय करोनाबाधित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १२८ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६१३ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८२ आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व ४८७ नमुने निगेटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४३२ पैकी ४३१ नमुने निगेटिव्ह आले, तर १ पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ५० हजार २६६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ७, तर लक्षणे असलेले १९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७, तर संस्थात्मक विलगीकरणात १९ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १०, तर डीसीएचमध्ये ९ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ६ जण ऑक्सिजनवर असून, दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या ८७ करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १९७२ जणांनी पहिला, तर ७७३९ जणांनी दुसरा डोस घेतला. त्या दिवशी एकूण ९,७११ जणांचे लसीकरण झाले. १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ९२ हजार ४५९ जणांचा पहिला, तर ५ लाख ७९ हजार ४८ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १५ लाख ७१ हजार ५०७ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply