person holding syringe

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे १२० रुग्ण, १०४ रुग्ण करोनामुक्त, चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १२० रुग्ण आढळले, तर १०४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २७ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात १११ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ९ जणांसह एकूण १२० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,२६७ रुग्णांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर असून ६ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ४२७ रुग्ण बाधित आढळले, तर ५३ हजार ६७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४८५ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १९, दोडामार्ग ६, कणकवली १५, कुडाळ १५, मालवण २०, सावंतवाडी २६, वैभववाडी ४, वेंगुर्ले ८, जिल्ह्याबाहेरील ४.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ११८, दोडामार्ग ७३, कणकवली १४८, कुडाळ ३५८, मालवण ११२, सावंतवाडी २१३, वैभववाडी ६६, वेंगुर्ले १५७, जिल्ह्याबाहेरील २२.

आज ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्याचा तपशील असा – कुडाळ, ५६ वर्षीय पुरुष, उच्च रक्तदाब. पडेल (ता. देवगड) ७५ वर्षीय पुरुष, हृदयविकार, उच्च रक्तदाब. सबनीसवाडा, सावंतवाडी २३ वर्षीय पुरुष. अन्य आजाराची नोंद नाही. महान (ता. मालवण) ६५ वर्षीय स्त्री. या चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४८५ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८२, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०२, कुडाळ – २४९, मालवण – २९३, सावंतवाडी – २१०, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply