रत्नागिरीत २५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येत्या २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रत्नागिरीत राज्य कॅरम निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.

येत्या ३० मार्च २०२२ ते ३ एप्रिल २०२२ या कालावधीत मुंबईत ४९ वी सिनियर नॅशनल कॅरम चॅम्पियनशिल २०२१-२२ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातर्फे खेळणाऱ्या ९६ पुरुष आणि महिला खेळाडूंची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने राज्य निवड चाचणी कॅरम स्पर्धा येत्या २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत रत्नागिरीत जे. के. फाइल्सजवळ साई मंगल कार्यालयात होणार आहे.

या क्रीडा वर्षातील ही पहिली राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२१-२२ या वर्षाचे जिल्हा नोंदणी शुल्क ५० रुपये आणि राज्या नोंदणी शुल्क १०० जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी एकेरी गटासाठी प्रत्येकी ५०० रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेची पुरुष आणि महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह मिलिंद साप्ते (९४२२४३३०५५) यांच्याकडे ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राष्ट्रीय पंच राहुल बर्वे आणि राष्ट्रीय पंच योगेश फणसळकर यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply