सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ३९ रुग्ण आढळले, तर ८७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. ५ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ३२ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ७ जणंसह एकूण ३९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६१६ रुग्णांपैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर असून १० रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज ८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार १०४ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार ९७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५०९ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग ३, कणकवली ५, कुडाळ ३, मालवण ५, सावंतवाडी ७, वैभववाडी ०, वेंगुर्ले ९, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७२, दोडामार्ग ३६, कणकवली ५७, कुडाळ १५५, मालवण ९८, सावंतवाडी ८९, वैभववाडी २४, वेंगुर्ले ६८, जिल्ह्याबाहेरील १७.
आज नेरूर (कुडाळ) येयथील ८१ वर्षीय पुरुष (मधुमेह, उच्च रक्तदाब) आणि हिंदळे (देवगड) येथील ७६ वर्षीय महिला (हृदयरोग, उच्च रक्तदाब) अशा दोघांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,५०९ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८४, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१४, कुडाळ – २५१, मालवण – २९७, सावंतवाडी – २१२, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड