hand holding petri dish

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ८९ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६० रुग्ण आढळले, तर कालच्याएढेच म्हणजे ८९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८४ हजार १२५ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार ८६८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.१३ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५९० पैकी ५५८ निगेटिव्ह, तर ३२ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ६९४ पैकी ६६६ नमुने निगेटिव्ह, तर २८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ७ हजार ७२९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६७५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४७४, तर लक्षणे असलेले २०१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४४५ असून, संस्थात्मक विलगीकरणात २३० जण आहेत. एकूण ६० रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ९१, तर डीसीएचमध्ये ११० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये २९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात १० रुग्ण दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.०४ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७९, चिपळूण ४९१, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३६, लांजा १३२, राजापूर १६६. (एकूण २,५२२).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५६ सत्रे पार पडली. त्यात २१३ जणांनी लशीचा पहिला, तर १,०७४ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,२८७ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ६६९, तर २३९ जणांनी बूस्टर डोस घेतले. ४ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४८ हजार ८७१ जणांचा पहिला, तर ८ लाख २७ हजार १८६ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ७६ हजार ५७ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply