रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ फेब्रुवारी) ४८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांच्यासह जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या ८१ हजार ६९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.२६ झाली आहे.
आज नवे ४१ रुग्ण आढळले. आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८४ हजार २१६ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३६२ पैकी ३४१ निगेटिव्ह, तर २१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ६६२ पैकी ६४२ नमुने निगेटिव्ह, तर २० पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ५८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ५४६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३४७, तर लक्षणे असलेले १९९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३१८ असून, संस्थात्मक विलगीकरणात २२८ जण आहेत. एकूण ७७ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८६, तर डीसीएचमध्ये ११३ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये २९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात १० रुग्ण दाखल आहेत.
आज चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२४ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.२३ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३७ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७९, चिपळूण ४९३, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३६, लांजा १३२, राजापूर १६६. (एकूण २,५२४).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५६ सत्रे पार पडली. त्यात २१३ जणांनी लशीचा पहिला, तर १,०७४ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,२८७ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ६६९, तर २३९ जणांनी बूस्टर डोस घेतले. ४ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४८ हजार ८७१ जणांचा पहिला, तर ८ लाख २७ हजार १८६ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ७६ हजार ५७ जणांचे लसीकरण झाले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड