man holding a warning sign about coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या दहाच्या खाली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ फेब्रुवारी) नव्या करोनाबाधितांची संख्या दहाच्या खाली आली. आज ८ नवे रुग्ण आढळले, तर ५० रुग्ण करोनामुक्त झाले. ही स्थिती आशादायक असताना आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मात्र झाली.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २५० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ५४, तर लक्षणे असलेले १९०६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ५४, तर संस्थात्मक विलगीकरणात १९६ जण आहेत. आणखी २५ रुग्णांची नोंद पोर्टलवर व्हायची बाकी आहे.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ३६० रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ५५३ म्हणजे ९६.६७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४०१ पैकी ३९७ निगेटिव्ह, तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ५३२ पैकी ५२८ नमुने निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १९ हजार २९१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७७, तर डीसीएचमध्ये ११९ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी १ रुग्ण ऑक्सिजनवर असून अतिदक्षता विभागात २ रुग्ण दाखल आहेत.

यापूर्वीच्या ३ आणि आजच्या २ अशा एकूण ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली.
दापोली, खेड, गुहागर १८१, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.७१ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.८० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८१, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२८, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २५३२).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात १६ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५७ सत्रे पार पडली. त्यात १२४ जणांनी लशीचा पहिला, तर १,५५७ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,६८१ जणांचे लसीकरण १६ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील १,०९२ जणांनी १६ फेब्रुवारीला लस घेतली, तर १९८ जणांनी बूस्टर डोस घेतला. १६ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५१ हजार २९ जणांचा पहिला, तर ८ लाख ४५ हजार ९८७ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ९७ हजार १६ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply