गोपिका रमणु स्वामी माझा…. – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१२ मार्च २०२२) – गोपिका रमणु स्वामी माझा….
सादरकर्ती संस्था – दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १२ मार्च २०२२ रोजी गोपिका रमणु स्वामी माझा…. हे नाटक दापोली (जि. रत्नागिरी) येथील दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा या संस्थेने सादर केले. ही दापोलीतील जुनी संस्था आहे. समाजोपयोगी आणि इतर अनेक कार्यक्रम संस्थेमार्फत केले जातात. सूर्यनमस्कार स्पर्धा, जोर, बैठका दोरी उड्या, लांब उडी इत्यादी स्पर्धा दरवर्षी १ ऑगस्टपूर्वी घेतल्या जातात आणि १ ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तसेच या संस्थेमार्फत परत करण्याच्या अटीवर मोफत रुग्ण साहित्य दिले जाते. त्यामध्ये बेड, व्हील चेअर, वॉकर इत्यादींचा समावेश आहे. दापोली तालुक्यातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा, यासाठी संस्थेने विलास कर्वे (रा. गिम्हवणे, ता. दापोली) यांनी लिहिलेले गोपिका रमणु स्वामी माझा… हे नाटक बसविले आहे. या नाटकाचा प्रयोग राज्य संगीत नाट्य स्पर्धेतच प्रथम झाला.

‘गोपिका रमणु स्वामी माझा…’ हे संगीत नाटक म्हणजे कृष्णाच्या राण्यांचे कृष्णावरील प्रेम, राधेची कृष्णाविषयी असलेली प्रेममयी मधुरा भक्ती आणि गोपिका आणि कृष्ण यांचा आत्मिक प्रेमसंयोग यांचे वर्णन आहे. कृष्णभक्तीत तल्लीन करणारी ही संगीत नाट्य कलाकृती आहे. भावपूर्ण कथा, कर्णमधुर शब्द आणि संगीताची मेजवानी असणारे हे नाटक आहे. लेखक – दिग्दर्शक – विलास भालचंद्र कर्वे, संगीत दिग्दर्शक – निळकंठ श्रीकांत गोखले.

कलावंत आणि भूमिका :
देविदास अशोक दातार – कृष्ण
सौ. पूजा प्रसाद लागू – रुक्मिणी
कु. गौरी शशिकांत खरे – सत्यभामा
अॅड. कु. नूतन प्रशांत परांजपे – राधा
डॉ. शिवप्रसाद सुधाकर दांडेकर – नारद
दिलीप विठ्ठल पेंडसे – सूत्रधार
सौ. प्राची मंदार बर्वे – नटी
डॉ. प्रमोद विनायक जोशी – राजवेद्य
आदित्य राजेंद्र रिसबूड – चंद्रदास
अनिरुद्ध प्रशांत मेहेंदळे – मंगलदास
श्रीप्रीति विश्‍वनाथ वैद्य – चंदा / सिंधू
कु. अनघा प्रकाश जोशी – मंगला/ शरयू
कु. निवेदिता प्रशांत परांजपे – यमुना
कु. पूर्णा श्रीरंग देवधर – कावेरी
सौ. वीणा अमेय कर्वे – विशाखा
कु. वेदश्री मंदार बाळ – छोटा कृष्ण
पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे – गोप
वेदांग शितूत – गोप
सौ. शर्वरी शशिकांत खरे – गोप सखी
सौ. श्वेता देवीदास दातार – गोप सखी

तंत्रज्ञ :
ऑर्गन – आनंद प्रभाकर वैशंपायन
तबला – चैतन्य सुहास गोडबोले
मृदुंग, तालवाद्य – नागेश रवींद्र किरडावकर
पार्श्वसंगीत – नितीन नामदेव बागडे
नेपथ्य – प्रभाकर महेश्वर वैशंपायन
प्रकाशयोजना – अनंत तुकाराम साळवी
वेशभूषा – सौ. योगिनी श्रीरंग देवधर
रंगभूषा – रामनाथ राजन आवले
रंगमंच व्यवस्था – प्रदीप गोविंद सोमण
कला – प्रशांत अशोक परांजपे

नाटकातील काही अंश सोबतच्या व्हिडीओमध्ये

स्पर्धेचे वेळापत्रक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply