सुवर्णतुला – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२० मार्च २०२२) – सुवर्णतुला
सादरकर्ती संस्था – परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज २० मार्च २०२२ रोजी सुवर्णतुला हे नाटक परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेने सादर केले.

विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या सुवर्णतुला या नाटकाची कथा श्रीधर कवींच्या हरिविजय ग्रंथावर आधारित आहे. रुक्मिणी-सत्यभामा यांच्यावरील सवतीमत्सर, प्राजक्तावरून भांडण, सत्यभामेचा अल्लडपणा आणि गर्व, त्या गर्वाचे हरण करण्यासाठी तसेच शुद्ध भक्तीचा महिला सत्यभामेला कळावा, यासाठी कृष्णाने नारदाच्या मदतीने केलेले कपटनाट्य आणि राधेच्या मुखातून सत्यभामा आणि रुक्मिणी यांना केलेला बोधात्मक उपदेश असे नाटकाचे सर्वसाधारण कथानक आहे. जन्मोजन्मी कृष्ण केवळ आपल्याला प्राप्त व्हावा, म्हणून सत्यभामा नारदांच्या सांगण्यावरून कृष्णाचे दान करते आणि कृष्णाची सुटका करण्यासाठी कृष्णाच्या भारंभार सुवर्णतुला करण्याची अट नारद घालतात. कितीही सुवर्ण पारड्यात घातले, तरी कृष्णाचे पारडे हलत नाही. त्यावेळी राधा येते आणि रुक्मिणी-सत्यभामेला प्रबोधनात्मक उपदेश करून शुद्ध भक्तीचा महिमा असलेले तुळशीचे एक पान त्या सुवर्णाच्या पारड्यात घालायला सांगते. त्या भक्तीच्या माहात्म्याने कृष्णाची तुला पूर्ण होते. रुक्मिणी-सत्यभामा यांना शुद्ध भक्तीचा महिमा राधा सांगते. तिच्या म्हणण्याला नारदही दुजोरा देतात आणि नाटक संपते.

श्रेयनामावली :
लेखक : कै. विद्याधर गोखले
दिग्दर्शक : घनश्याम जोशी
संगीत मार्गदर्शक : घनश्याम जोशी
विशेष साह्य : विलास हर्षे आणि खल्वायन संस्था, रत्नागिरी, हेमंत देशमुख
प्रकाशयोजना : अमेय धोपटकर
नेपथ्य : सुधाकर घाणेकर
रंगभूषा : प्रसाद लोगडे
वेशभूषा : अभयं जोशी
केशभूषा : सौ. योगिता जोशी
ध्वनी : एस्‌ कुमार साऊंड रलागिरी
रंगमंच व्यवस्था : संजय गडदे, दीपक जोशी
ऑर्गन : कु. स्वानंद नेने
तबला : प्रथमेश शहाणे
पार्श्वसंगीत : कु. अमेय भडसावळे

स्पर्धेचे वेळापत्रक

२३ मार्च – सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा, विठू आले माहेरा, लेखक : महादेव हरमलकर, दिग्दर्शक : अनिल आसोलकर.

२४ मार्च – मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, मोरजी, पेडणे, गोवा. शिक्का कट्यार, लेखक : यशवंत नारायण टिपणीस, दिग्दर्शक : साबाजी गं. च्यारी.

२५ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन माझिरे.

२५ मार्च (सायंकाळी ७.०० वाजता) – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.

२६ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत पंढरपूर, लेखक : जगदीश दळवी, दिग्दर्शक : वैशंपायन.

२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply