कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र! विषयावर लेख स्पर्धेचे आयोजन

मुंबई : कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! या विषयावर मराठी वृत्तपत्र लेखक संघाने लेख स्पर्धा आयोजित केली आहे. याच विषयावरील परिसंवादही होणार आहे.

आचार्य अत्रे

महाराष्ट्राच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्राचा लढ्याला फार महत्त्व आहे. १९५५ ते १९६० अशी सलग पाच वर्षे संयुक्त महाराष्ट्र समितीने जो लढा दिला, त्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या जनआंदोलन लढ्याचे नेतृत्व करणारे आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील, सेनापती बापट,शाहीर अमरशेख असे थोर नेते या विजयाचे शिल्पकार होते. परंतु ज्याला तोफखाना म्हणता येईल असे वाणी आणि लेखणीने आचार्य अत्रे यांनी जबरदस्त काम केले. मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी उभे करण्यात अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. राजकीय नेते सगळीकडे वा सगळ्या राज्यांमध्ये सारखेच असतात, पण असे म्हटले जायचे की महाराष्ट्रातील राजकारण एकेकाळी सभ्यतेच्या पातळीवर होते. परंतु गेल्या काही वर्षांत सत्ताकारणासाठीच्या राजकीय घडामोडी पाहता सर्वसामान्य मराठी माणसाला काही प्रश्न पडले आहेत. या अनुषंगाने मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई) आणि आचार्य अत्रे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ”कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र !” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. राजेंद्र पै आपले आजोबा ”आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र” या विषयावर बोलणार आहेत.

शुक्रवार, दि. २९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ .३० वाजता दादर दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर याच विषयावर खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. मराठीमध्ये ३०० शब्दात टाइप करून लेख chalval1949@ gmail.com या मेलवर अथवा राजन देसाई यांच्या 8779983390 या व्हाट्स ॲपवर पाठवावा. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना तीन रोख पारितोषिके आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड. आरती पुरंदरे-सदावर्ते यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply