राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व

डेरवण (ता. चिपळूण) : महाराष्ट्र राज्य निवड अकरा वर्षांखालील खुल्या व मुलींच्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे डेरवण येथील विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या स्पोर्ट्स अॅकॅडमी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व राहिले.

स्पर्धेतील खुल्या गटात प्रथमेश शेरला, तर मुलींच्या गटात निहिरा कौल अजिंक्य ठरली. पुण्याचा अविरत चौहान आणि नागपूरच्या वृत्तिका गमे यांना उपविजेतेपद मिळाले.

स्पर्धेचा विस्तृत निकाल असा :
११ वर्षांखालील मुले :
१. प्रथमेश शेरला पुणे
२. अविरत चौहान पुणे
३. अंश नंदन नेरुरकर मुंबई उपनगर
४. सोनी अथर्व ठाणे
५. विक्रमादित्य चव्हाण सांगली
६. बडोले शौनक नागपूर
७. आदित्य जोशी पुणे
८. तसीन तडवी जळगाव
९. शाश्वत गुप्ता पुणे
१०. रियार्थ पोद्दार कोल्हापूर
११. श्रीहर्ष नायर ठाणे
१२. अलौकिक सिन्हा पुणे
१३. माळी श्लोक पुणे
१४. भुवन शितोळे पुणे
१५. साळुंके सिद्धांत पुणे

९ वर्षांखालील मुले :
आर्यन वाघमारे ठाणे
ओम रामगुडे पुणे
आराध्या पार्टे ठाणे

७ वर्षांखालील गट :
राजपूत धैर्य पुणे
राणा रणवीर भोसले परभणी
पार्थ शिंदे पुणे

११ वर्षांखालील मुली :
१. निहिरा कौल पुणे
२. वृत्तिका गमे नागपूर
३. परदेशी चतुर्थी पुणे
४. प्रिशा केसरवानी मुंबई उपनगर
५. सई पाटील पुणे
६. विहा शहा पालघर
७. ज्ञानदा गुजराती रायगड
८. स्वधा दातीर यवतमाळ
९. हिरण्मयी कुलकर्णी मुंबई उपनगर
१०. मर्गज प्रिशा मुंबई उपनगर
११. ओवी पावडे पुणे
१२. अरीना मोदी कोल्हापूर
१३. देशमुख साजिरी सातारा
१४. खनक पहारिया मुंबई उपनगर
१५. संस्कृती सुतार कोल्हापूर

९ वर्षांखालील मुली :
साची चिलकनवार मुंबई उपनगर
सान्वी गोरे सोलापूर
स्मिती शेडगे रायगड

७ वर्षांखालील मुली :
अविरा फडके सांगली
आस्था यलमल्ली सांगली

सर्वोत्कृष्ट रत्नागिरी खेळाडू :
टोकळे सहर्ष रत्नागिरी
प्रणव एम जे रत्नागिरी
रुमीन नवाज वस्ता रत्नागिरी
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, सहसचिव अंकुश रक्ताडे व चंद्रकांत वळवडे, चेस इन स्कुल्स उपक्रमाचे सचिव विलास म्हात्रे यांच्यासह जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे, उदय गांधी, रमण डांगे, शशिकांत मोदी, अमरदीप परचुरे, शैलेश सावंत आदि उपस्थित होते.

राज्य संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात लवकरच फिडे मानांकित व बिगर फिडे मानांकित असे दोन गट करून त्यांच्यासाठी ग्रॅण्डमास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय मास्टर्स यांचे प्रशिक्षण वर्ग चालू करणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. येणाऱ्या वर्षांत एकूण एक हजार शाळांत चेस इन स्कुल्स अंतर्गत बुद्धिबळाचे धडे मुलांना गिरवताना आपण लवकरच बघू असा आत्मविश्वासही त्यांनी बोलून दाखवला. कोकणात बुद्धीबळाचा प्रसार होण्यासाठी यापुढे विविध प्रकल्प येथील जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच सुरु करणार असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पहिल्याच क्लासिकल फिडे मानांकन राज्य निवड स्पर्धेची आयोजनाची जबाबदारी रत्नागिरीला दिल्याबद्दल श्रीराम खरे यांनी राज्य बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे आभार मानले. तसेच वर्षांतून किमान एकतरी फिडे मानांकन स्पर्धा संघटनेमार्फत घेण्याचा मानस बोलून दाखवला.

स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून मंगेश गंभीर तर पौर्णिमा उपळवीकर, आरती मोदी, सौमिल शिंदे आणि दीपक वायचळ यांनी सहाय्यक पंच म्हणून काम बघितले. रत्नागिरीच्या विवेक सोहनी आणि चैतन्य भिडे यांनी स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी सांभाळली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply